चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!

रविवार, २३ जानेवारी, २०११

 चारोळी- २५

तुझ्यावर चारोळी करायची म्हटलं,
कि शब्द कसे आपोआप सुचतात,
आकार घेता-घेता कागदावर जणू
लेखणीसोबत  स्पर्धा करायला बघतात.


शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

 चारोळी- २४

अश्याच एका पहाटे, एकाच फ़ांदीवर गुलाबाची दोन फूलं,
गुलाबी थंडीत हवेच्या तालावर नाचत होती, 
हळूच लपून मग आपल्याला बघून,
बघ आपण इथे एकटेच नाही, असं एकमेकांना सांगत होती!


बुधवार, १२ जानेवारी, २०११

 चारोळी- २३

तु म्हणतेस, मी रेखाटलेल्या चित्रांपेक्षा,
तुला माझ्या चारोळ्या जास्त आवडतात,
कारण ते चित्र तुझ्या सौंदर्याची साक्ष देतात,
आणि त्या चारोळ्या, तु्झ्या ह्वदयाची!







मंगळवार, ४ जानेवारी, २०११

 चारोळी- २२

हात तुझा हातात घेऊन, 
मी नविन वर्षात पाऊल ठेवलं...
या वर्षाचच नाही, तर पुर्ण जिवणाचं स्वप्न
मग मी तुझ्या चमकदार डोळ्यांमध्ये पाहिलं!



 चारोळी- २१

जुन्या वर्षाला निरोप देतांना,
एकच होती माझी इच्छा,
आयुष्यातील सर्व कडू आठवणी बाजुला सारून,
द्याव्यात तुला नव वर्षाच्या शुभेच्छा!





Next previous home