चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!

रविवार, २० मार्च, २०११

 चारोळी- २६

रंगांच्या या दिवशी तुझ्या ह्रदयावर रंगलेला
एकच तो रंग प्रेमाचा , मन मोहून घेतो...
आणि सप्तरंगात रंगलेला इंद्रधणू सुद्धा मग,
पावसातही तुझ्यासमोर अगदी कोरडाच दिसतो!

रविवार, २३ जानेवारी, २०११

 चारोळी- २५

तुझ्यावर चारोळी करायची म्हटलं,
कि शब्द कसे आपोआप सुचतात,
आकार घेता-घेता कागदावर जणू
लेखणीसोबत  स्पर्धा करायला बघतात.


शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

 चारोळी- २४

अश्याच एका पहाटे, एकाच फ़ांदीवर गुलाबाची दोन फूलं,
गुलाबी थंडीत हवेच्या तालावर नाचत होती, 
हळूच लपून मग आपल्याला बघून,
बघ आपण इथे एकटेच नाही, असं एकमेकांना सांगत होती!


previous home