चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!
!—continuous>
रविवार, २४ ऑक्टोबर, २०१०
चारोळी- १५
काट्यात गुंतलेल्या ओढणीच्या बहाण्याने
,
ती त्याला तिरकस नजरेने लपून बघत होती
,
नाजूक बोटं आणि काट्यामध्ये अडकलेली ओढणी सुद्धा मग
,
चोळामोळा होऊन तिच्या लाजण्याशी स्पर्धा करत होती!
चारोळी- १४
तुझ्या बोलांचा अर्थ मला
,
शब्दांपेक्षा डोळ्यांवाटे स्पष्ट कळतो
...
तु अशीच शांत बसून रहा
,
मी असच तुझं मन वाचून घेतो
.
चारोळी- १३
पाहिलं होतं बागेत मी काल
,
एकाकी तू विचारमग्न असतांना
...
आणि नाजूक सप्तरंगी फुलपाखराला
,
बेधुंद होऊन तुझ्या भोवती बागडतांना
!
शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०१०
चारोळी- १२
तुला भेटण्यापुर्वी असं वाटलं होतं,
मानवी मन सर्वात चपळ असतं,
आज त्यानेही तुझ्या विचारात कैद होऊन,
मानलं की प्रेमासाठी अशक्य असं काहीच नसतं!
मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०१०
चारोळी- ११
ग्रिष्मात तडपलेल्या पृथ्वीला बघून
आभाळाने बेचैन होणं रास्त आहे...
कडाडलेल्या विजांसोबत पावसाचं येणं म्हणजे
कंठ फुटून त्याचं रडणं आहे!
बुधवार, १३ ऑक्टोबर, २०१०
चारोळी- १०
एकांती पाऊलवाटेवर तुझं
माझ्या हातात हात घेऊन चालणं...
दोघे जरी आपण असलो तरी
नशिब मात्र एकच आहे ह्याची खात्री करून देणं
!
चारोळी- ९
स्वतःच असं म्हणन्यासाठी माझ्याकडे
काही राहीलच नाही आता...
माझ्या जिवंतपणाची निशाणी असणारं ह्रदय
ते ही धडकतय
,
फक्त तुझ्यासाठीच सदा
!
चारोळी- ८
अचानक आलेल्या या पावसात
अचानक आलेली तुझी आठवण...
घट्ट मिटलेल्या माझ्या पाणावलेल्या डोळ्यात
करून दिलेल्या मधूर क्षणांची तु साठवण!
चारोळी- ७
आरशाने माझ्याकडे एक तक्रार केली
,
म्हणाला आजकाल ती स्वतःकडे बघूनच लाजते
,
आणि ती म्हणते इश्श
..
स्वतःच कुठे?
डोळे माझे असतात
,
पण नजर मात्र तुझीच असते!
मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०
चारोळी- ६
खेळ हा दोन नशिबांचा
,
इथे अगदी निराळाच आहे...
दोघांची हार
,
नाहितर दोघांचीही जीत
,
हाच ह्या खेळाचा एकुलता
नियम
आहे!
रविवार, १० ऑक्टोबर, २०१०
चारोळी- ५
हळूच आणि मधाळ तिचं बोलणं
,
वेड लावून जातं तिचं गोड हसणं
,
कुठेतरी माझच नशिब चांगलं आहे
,
हेच तिचं माझ्या आयुष्यात येऊन सांगण
!
चारोळी- ४
इवलसं ह्रदय आहे ग तुझं
,
पण त्यात
अनंत
प्रेम सामावलेलं
जनू काही पहिल्या पावसाच्या एका थेंबातच
वेड्या चातकाने अख्ख आयुष्य जगलेलं
चारोळी- ३
न बोलताही
ती,
बरच काही बोलून गेली
,
घनदाट या काटेरी वनात
,
एक पाऊलवाट दाखवून गेली
..
चारोळी- २
इथे प्रत्येक नशिबाच्या वाटा
एकमेकांशी अश्या जुडलेल्या असतात
,
अस्ताव्यस्त पसरलेल्या या चांदण्यांच्या गर्दीत
,
जशी आकर्षक नक्षत्र लपलेली असतात
.
चारोळी- १
बंद घरात बंद तो चिमणा,
काचेच्या खिडकीवर झडपा मारत होता...
प्रेमासाठी आसुसलेला तो
स्वत्ताची रक्तबंबाळ चोचही विसरत होता.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)