चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

 चारोळी- २०

आठवतय मला, अगदी पहिल्याच भेटीत,
माझं तुझ्या मनात घर करून राहणं...
आणि मग चेह-याच्या दारात, गुलाबी रंगाने,
तुझं मनमोहक हास्याची रांगोळी काढणं!

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०

 चारोळी- १९

काही नाते असतातच असे,
कधीही साथ न संपणारे,
सुकतात जरी झाडावरच काही फूलं,
तरी मरेपर्यंत देठ न सोडणारे!गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०१०

 चारोळी- १८

मनाला शब्द सापडले नाही की,
त्याच्या भावना अव्यक्तच राहतात...
म्हणूनच कदाचित अश्या वेळी डोळे..
त्या सुप्त भावनांना शब्दांशिवाय व्यक्त करून जातात!


रविवार, ७ नोव्हेंबर, २०१०

 चारोळी- १७

चिमणा-चिमणीचं छोटसं घरटं प्रेमाचं,
असेना का फक्त सुक्या काड्यांचं...
इथेच पिल्लांना बाळकडू मिळतं
खुल्या आसमानाला कवेत घेण्याचं!


सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

 चारोळी- १६

जवळ असूनही ती,
मी थोडा दूरच होतो...
ती होती सागर,
अन मी किनाराच होतो!Next previous home