चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!
!—continuous>
रविवार, २३ जानेवारी, २०११
चारोळी- २५
तुझ्यावर चारोळी करायची म्हटलं,
कि शब्द कसे आपोआप सुचतात,
आकार घेता-घेता कागदावर जणू
लेखणीसोबत स्पर्धा करायला बघतात.