अश्याच एका पहाटे, एकाच फ़ांदीवर गुलाबाची दोन फूलं, गुलाबी थंडीत हवेच्या तालावर नाचत होती, हळूच लपून मग आपल्याला बघून, बघ आपण इथे एकटेच नाही, असं एकमेकांना सांगत होती!
तु म्हणतेस, मी रेखाटलेल्या चित्रांपेक्षा, तुला माझ्या चारोळ्या जास्त आवडतात, कारण ते चित्र तुझ्या सौंदर्याची साक्ष देतात, आणि त्या चारोळ्या, तु्झ्या ह्वदयाची!